कारची किंमत
सिद्धार्थने कियाराला भेट दिलेली कार म्हणजे टॉयोटा वेलफायर. ही कार फक्त काही मोजक्या बॉलिवूड कलाकारांकडे आहे. अजय देवगण, अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, क्रिती सेनन, अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्याकडे देखील ही गाडी आहे. या कारची किंमत सुमारे 1.12 कोटी रुपये आहे. याशिवाय सिद्धार्थ आणि कियाराकडे आधीपासूनच अनेक आलिशान कार्सचं कलेक्शन आहे. त्यामुळे ते दोघंही एक आलिशान जीवनशैली जगतात.
लग्नाचा क्षण
कियारा आणि सिद्धार्थने 7 फेब्रुवारी 2023 रोजी विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या विवाहसोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक मित्रांनीच उपस्थिती लावली होती.
प्रोफेशनल लाइफ
सध्या प्रोफेशनल फ्रंटवर पाहिलं तर सिद्धार्थ मल्होत्रा ‘परम सुंदरी’ या चित्रपटात झळकणार आहे, ज्यात त्याच्या सोबत जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. कियाराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘गेम चेंजर’ या चित्रपटात दिसली आहे. तसेच तिनं काही दिवसांपूर्वीच ‘वॉर 2’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असणार आहेत. ‘वॉर 2’ 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.