Home » टी-सीरिजवर बीट चोरीचा आरोप! ‘दो पत्ती’च्या ‘रांझण’ गाण्यावर आंतरराष्ट्रीय आर्टिस्टचा दावा

टी-सीरिजवर बीट चोरीचा आरोप! ‘दो पत्ती’च्या ‘रांझण’ गाण्यावर आंतरराष्ट्रीय आर्टिस्टचा दावा

 

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दो पत्ती या सिनेमातील ‘रांझण’ हे गाणं चार्टबस्टर ठरलं होतं. आजही हे गाणं टॉप 10 गाण्यांच्या यादीत आहे. मात्र आता या गाण्यावर कॉपीराइटचा वाद निर्माण झाला आहे.

 

 

 

रांझण गाण्यावर वादाची छाया

 

आंतरराष्ट्रीय म्युझिक प्रोड्यूसरचा बीट चोरीचा आरोप

 

टी-सीरिजने आर्टिस्टच्या संदेशाला दिला नाही प्रतिसाद

 

सोशल मीडियावर वादग्रस्त खुलासा

 

 

 

 

कृति सेनन आणि शहीर शेख अभिनीत दो पत्ती हा चित्रपट चर्चेत असला, तरी चर्चेचं कारण चित्रपट नसून त्यातील रांझण हे सुपरहिट गाणं आहे. या गाण्याचे निर्माते टी-सीरिजवर आंतरराष्ट्रीय म्युझिक प्रोड्यूसरने प्लेजरिझमचा (बीट चोरीचा) आरोप केला आहे.

 

त्या आर्टिस्टने सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी त्याने ही बीट तयार केली होती. परंतु त्याला एक वर्षानंतर समजलं की भारतात ट्रेंड होणारं रांझण गाणं त्याच्या बीटवर आधारित आहे.

 

 

 

आंतरराष्ट्रीय आर्टिस्टची नाराजी

 

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना म्युझिक प्रोड्यूसर KMKZ म्हणाला,

“मी भारतात नंबर वन गाणं तयार केलं, पण मला त्याची कल्पनाच नव्हती. मी बीट्स ऑनलाइन विकतो. दोन वर्षांपूर्वी ही बीट मी अपलोड केली होती. अलीकडेच कुणीतरी मला मेसेज करून सांगितलं की, एका गाण्यात माझं पियानो बीट वापरलं गेलं आहे. मात्र मला कुठलाही क्रेडिट दिला नाही.”

 

 

 

टी-सीरिजकडून प्रतिसाद नाही

 

KMKZ पुढे म्हणाला,

“Spotify वर या गाण्याचे 29 कोटींहून अधिक स्ट्रीम आहेत. पण गाण्याच्या क्रेडिट्समध्ये कुठेही माझं नाव नाही. मी टी-सीरिजला, तसेच संबंधित आर्टिस्टना ईमेल पाठवले, पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी जवळपास युट्यूबवरून माझ्या धुना घेतल्या, मला पैसे दिले नाहीत, क्रेडिटही दिलं नाही. आज हे

गाणं इंडियन बिलबोर्डवर नंबर वन आहे.”