जगातील सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल्सपैकी एक असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये यंदाही जगभरातील स्टार्सनी रेड कार्पेटवर आपला ग्लॅमर दाखवला. यंदाच्या वर्षी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीनीही आपल्या अदांनी उपस्थितांची मने जिंकली.
कान्स 2025 मध्ये नितांशी गोयलचा धमाकेदार डेब्यू
‘लापता लेडीज’मधील फुल कुमारीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली 17 वर्षांची नितांशी गोयल हिने यंदा कान्समध्ये डेब्यू केला आहे. रेड कार्पेटवर ती ब्लॅक स्ट्रॅपलेस गाउनमध्ये उतरली होती, जो ‘जेड बाय मोनिका अँड करिश्मा’ यांचा खास डिझाईन होता. गाउनवर सोनसळी डिटेलिंग असून तो फारच भव्य दिसत होता.
नितांशीने मिनिमल ज्वेलरीमध्ये स्टेटमेंट नेकलेस आणि इअररिंग्जसह आपला लुक पूर्ण केला होता. ग्लॉसी मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि स्लीक पोनीटेलमुळे ती अधिक उठून दिसत होती. तिचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
तिचा आधीचा व्हाईट ड्रेस लुकही लक्षवेधी ठरला होता, जिथे तिने बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींच्या फोटोंना आपल्या पोनीटेलमध्ये सजवले होते.
जैकलीन फर्नांडिसचाही कान्समधील जलवा कायम
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जैकलीन फर्नांडिसही यंदाच्या कान्स फेस्टिवलचा भाग होती. तिने रेड कार्पेटपूर्वीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. व्हाईट ड्रेससह तिने सिल्वर चैनसह आपला लुक अधिक उठावदार बनवला होता. तिचा हाजिरजवाबी आणि एलिगंट अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरला.
जैकलीन-नितांशीचे लुक्स ठरले चर्चेचा विषय
कान्स 2025 च्या रेड कार्पेटवर नितांशी गोयल आणि जैकलीन फर्नांडिस या दोघींनीही आपापल्या खास लुक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वाचायला विसरू नका –
कान्स 2025: शेवटच्या क्षणी Halle Berry ला बदलावी लागली ड्रेस, नवा ड्रेस कोड ठरला डोकेदुखी