मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने $2.9 अब्ज इतकं दुहेरी चलनातलं कर्ज उचललं असून, हे गेल्या वर्षभरातील भारतातील सर्वात मोठं ऑफशोअर कर्ज मानलं जात आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या syndicated कर्जात तब्बल ५५ बँकांनी सहभाग घेतला असून, हे आतापर्यंतचं आशिया खंडातील सर्वात मोठं syndicated loan arrangement आहे.
या व्यवहारात $2.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि ¥67.7 अब्ज (सुमारे $462 मिलियन) येन यांचा समावेश आहे. हे करार 9 मे रोजी अधिकृतपणे स्वाक्षरीत करण्यात आले.
2025 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजवर व्याजासह $2.9 अब्ज इतकी परतफेड करण्याची जबाबदारी आहे.
बाजारात सौद्यांची कमतरता असताना, गुंतवणूकदारांच्या दर्जेदार कर्जांवरील वाढती मागणी या व्यवहारातून स्पष्ट होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज सध्या भारताच्या सार्वभौम दर्जापेक्षा एक पायरी वर असल्याचे रेटिंग आहे – मूडीजकडून ‘Baa2’ आणि फिचकडून ‘BBB’ असे रेटिंग प्राप्त झाले आ