Home » शर्मिष्ठा पनोली यांना दोन अटींवर जामीन; धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय

शर्मिष्ठा पनोली यांना दोन अटींवर जामीन; धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – सोशल मीडियावर वादग्रस्त आणि सांप्रदायिक व्हिडिओ शेअर केल्याच्या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पनोली यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती राजा बसू यांनी हा निर्णय दिला. मात्र न्यायालयाने दोन महत्त्वाच्या अटींसह त्यांना ही दिलासा दिला आहे.

जामिनाच्या अटी काय आहेत?

1. विदेश प्रवासावर बंदी – कोर्टाने स्पष्ट केले की, शर्मिष्ठा पनोली मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेता देश सोडू शकत नाहीत.

2. १० हजार रुपयांचा जामिनाचा बॉन्ड – न्यायालयाने त्यांना १०,००० रुपयांचा वैयक्तिक हमी बॉन्ड भरण्याचे निर्देश दिले.

 

शर्मिष्ठा यांना सोशल मीडियावर धमक्या

शर्मिष्ठा यांनी न्यायालयात सांगितले की त्यांना सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात आहेत. त्यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने कोलकाता पोलिसांना त्यांच्या सुरक्षेसंदर्भात तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर न्यायालयाचे निरीक्षण

सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, भारतात आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्याचा गैरवापर करून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नयेत. आपला देश अनेक जाती-धर्मातील नागरिकांचा आहे आणि त्यामुळे व्यक्त करताना संयम राखणे गरजेचे आहे.

तसेच, न्यायालयाने स्पष्ट केले की, जरी गुन्ह्याची शिक्षा सात वर्षांपेक्षा कमी असली, तरी पोलिसांना अटक करण्याचा अधिकार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *