Home » गौतम गंभीरला कौटुंबिक धक्का; आईला हृदयविकाराचा झटका, इंग्लंड दौरा अर्धवट सोडून परतला भारतात

गौतम गंभीरला कौटुंबिक धक्का; आईला हृदयविकाराचा झटका, इंग्लंड दौरा अर्धवट सोडून परतला भारतात

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली —
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अचानकपणे इंग्लंड दौऱ्यातून भारतात परतले आहेत. त्यांच्या आईची तब्येत अचानक खालावल्याने गंभीरने हा निर्णय घेतला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने दिल्लीला जावं लागलं.

गंभीर यांच्या आईंची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांच्यावर सध्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत काहीशी स्थिरता आली असली तरी डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. ही माहिती मिळताच गंभीर तात्काळ देशात परतले.

कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार असताना, प्रशिक्षक गंभीर यांचा दौऱ्यातून निघून जाणं ही टीमसाठी मोठी धक्का मानली जात आहे. भारतीय संघ 7 जून रोजीच इंग्लंडमध्ये दाखल झाला होता आणि 13 जूनपासून इंट्रा-स्क्वॉड सामने सुरू होत आहेत.

गंभीर परत येणार का इंग्लंडला?

सूत्रांच्या माहितीनुसार, गौतम गंभीर 17 जून रोजी इंग्लंडला परतण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, परिस्थिती गंभीर राहिल्यास ते परत येऊ शकणार नाहीत. अशा स्थितीत बीसीसीआयकडून अंतरिम प्रशिक्षकाची नियुक्ती होऊ शकते.

VVS लक्ष्मण यांची शक्यता

जर गंभीर 20 जूनपूर्वी इंग्लंडला जाऊ शकले नाहीत, तर NCAचे संचालक आणि माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांना तात्पुरते प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, BCCI ने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक (2025)

पहिली कसोटी – 20 ते 24 जून | हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी – 2 ते 6 जुलै | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी – 10 ते 14 जुलै | लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी – 23 ते 27 जुलै | ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी – 31 जुलै ते 4 ऑगस्ट | द ओव्हल, लंडन

 

भारताचा कसोटी संघ – इंग्लंड दौरा 2025:

कर्णधार: शुभमन गिल

उपकर्णधार व यष्टीरक्षक: ऋषभ पंत

फलंदाज: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी

अष्टपैलू खेळाडू: रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर

गोलंदाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

यष्टीरक्षक: ध्रुव जुरेल