उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही समस्या अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यांना नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे. नियमित चालणे यात मदत करू शकते, पण जर चालण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला तर त्याचे फायदे दुप्पट मिळतात. यालाच इंटरवल वॉकिंग (Interval Walking) म्हणतात.
इंटरवल वॉकिंग काय आहे?
इंटरवल वॉकिंग म्हणजे चालताना गती बदलणे. काही वेळ जलद गतीने चालायचे आणि मग काही वेळ मंद गतीने चालून शरीराला विश्रांती द्यायची. उदाहरणार्थ –
३ मिनिटे साध्या गतीने वॉर्म-अप
२ मिनिटे जलद गतीने वॉक (ज्यात श्वास लागतो)
३ मिनिटे मंद गतीने वॉक (रिकव्हरीसाठी)
हा क्रम ४-५ वेळा पुन्हा करा
शेवटी ५ मिनिटे मंद चालून कूल-डाउन करा
इंटरवल वॉकिंगचे आरोग्यदायी फायदे
1. रक्तदाब नियंत्रण – जलद चालण्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण वेगवान होते आणि धमन्या लवचिक राहतात. यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. तसेच, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते.
2. शुगर कंट्रोल – जलद चालताना स्नायूंना अधिक ऊर्जा लागते आणि त्यासाठी रक्तातील ग्लुकोजचा वापर होतो. यामुळे इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारते आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहतो. टाइप-२ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उत्तम उपाय ठरतो.
3. वजन कमी करण्यात मदत – या पद्धतीने चालल्यास कॅलरी जास्त प्रमाणात बर्न होतात, मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
4. हृदय निरोगी ठेवते – कार्डियोव्हॅस्क्युलर फिटनेस सुधारतो, हृदय मजबूत होते आणि रक्तपुरवठा अधिक चांगला होतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
5. उर्जेत वाढ – नियमित इंटरवल वॉकिंगमुळे स्टॅमिना वाढतो, दिवसभर शरीर ऊर्जावान राहते आणि थकवा कमी जाणवतो.
