Home » अहमदाबाद विमान अपघातानंतर हेल्पलाइन क्रमांक जाहीर, संपर्कासाठी तपशील

अहमदाबाद विमान अपघातानंतर हेल्पलाइन क्रमांक जाहीर, संपर्कासाठी तपशील

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात घडला. एअर इंडियाचे लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे विमान 242 प्रवाशांसह दुपारी उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच शाहीबाग विमानतळाजवळ कोसळले. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

एअर इंडियाने या विमान अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक 1800 5691 444 जारी केला आहे. तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाने आपले ऑपरेशन कंट्रोल रूम सक्रिय केले असून, अधिक माहितीसाठी 011-24610843 आणि 9650391859 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांनी सांगितले की, ते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. “अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी ऐकून मी स्तब्ध आणि व्यथित आहे. सर्व विमानसेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. बचाव पथके घटनास्थळी पाठवली असून मदतकार्य सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

घटनास्थळी अग्निशमन दल आणि इतर मदत यंत्रणा दाखल झाल्या आहेत. गांधीनगरहून 90 कर्मचाऱ्यांचे तीन राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) पथक पाठवण्यात आले आहे. याशिवाय वडोदऱ्यावरून आणखी तीन पथके घटनास्थळी पाठवली जात आहेत, अशी माहिती NDRF कडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *