Home » फ्रान्समध्ये हिंसाचार पेटला; 200 आंदोलक अटक

फ्रान्समध्ये हिंसाचार पेटला; 200 आंदोलक अटक

 

पॅरिस : नेपाळातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता फ्रान्सची राजधानी पॅरिस (Paris Protests) पेटली आहे. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी आगजनी केली आहे. पोलिसांनी 200 पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला.

पॅरिसमध्ये आंदोलक आणि पोलिस आमने-सामने

 

‘ब्लॉक एव्हरीथिंग मूव्हमेंट’नंतर आंदोलकांनी पॅरिसच्या रस्त्यांवर धुमाकूळ घातला. रस्ते बंद करण्यात आले, वाहनांना आग लावली गेली. पोलिसांनी बॅरिकेड तोडणाऱ्या आंदोलकांना ताबडतोब पकडले. हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले.

 

छावणीत रूपांतरलेले शहर

 

आंतरिक मंत्री ब्रुनो रिटेलेउ यांनी सांगितले की आंदोलकांचा ‘सगळं बंद’ करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. तरीही पॅरिसमध्ये 80 हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले. पश्चिम फ्रान्समधील रेन येथे आंदोलकांनी बस जाळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आणि रेल्वे सेवा थांबली.

 

आंदोलनाचे कारण काय?

 

या हिंसेमागे फ्रान्सचे माजी पंतप्रधान बायरू यांचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. त्यांनी 44 अब्ज युरो (सुमारे 4 लाख कोटी रुपये) वाचवण्याची योजना सादर केली होती. यामुळे तीव्र विरोध झाला आणि अखेर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यानंतर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांनी संरक्षणमंत्री लेकोर्नू यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. या निर्णयाविरोधात आता आंदोलन तीव्र झाले आहे.

 

यापूर्वीही हिंसा

 

पॅरिसमध्ये याआधीही अशा प्रकारची हिंसा पाहायला मिळाली आहे. 2022 मध्ये पेन्शन सुधारणांवरून तरुणांचा रोष व्यक्त झाला होता. 2023 मध्ये पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं

तर शहर पेटले होते.