Home » पुण्यात मध्यरात्री रस्त्यावर तरुणीवर निर्दयी हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण, संतापजनक व्हिडिओ व्हायरल!

पुण्यात मध्यरात्री रस्त्यावर तरुणीवर निर्दयी हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण, संतापजनक व्हिडिओ व्हायरल!

 

पुणे गुन्हा बातमी: देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, पुण्यात घडलेली एक धक्कादायक घटना समाजाला हादरवून सोडणारी ठरली आहे. विद्येच्या माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एका तरुणाने किरकोळ वादातून एका तरुणीला कानशिलात मारून भर रस्त्यावर निर्दयपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या घटनेचा परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

नेमकं काय घडलं?

ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजता पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर मार्गावर घडली. मारहाण करणारा तरुण आणि पीडित तरुणी यांच्यातील नेमका काय वाद झाला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेमुळे पुण्यात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

 

 

भारतामध्ये अमलीपदार्थ पुरवठ्याचा मास्टरमाइंड अटकेत; पाकिस्तानशी जोडलेला धागा उघड

 

नालासोपारा: भारतात हेरॉईन नावाचा अमलीपदार्थ पुरवणाऱ्या मोठ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर विरार गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाच्या हाती लागला आहे. अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानातून भारतात हेरॉईन पुरवठा करणाऱ्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

अटक केलेल्या मुख्य आरोपीला वसई न्यायालयाने 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

कारवाईचा तपशील:

11 सप्टेंबर रोजी विरार गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाने फादरवाडी रेंजनाका रस्त्यावरील श्रीपाल टॉवर येथे सापळा रचून 8 कोटी 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 2 किलो 11 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते.

या प्रकरणात समुंदरसिंग देवडा (49), युवराजसिंग राठोड (28) आणि तकतसिंग राजपूत (38) या तिघांना अटक करण्यात आली होती.

सखोल चौकशीतून या अमलीपदार्थ तस्करीच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजस्थानचा असल्याचे उघड झाले असून त्यालाही बेड्या ठो

कण्यात आल्या आहेत.