नवी दिल्ली | क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वित्त मंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने (FIU) मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत २५ विदेशी क्रिप्टो एक्सचेंजना (offshore crypto exchanges) नोटिसा बजावल्या आहेत. हे प्लॅटफॉर्म अमेरिका, हॉंगकॉंग, कंबोडिया, सिंगापूर, ब्रिटन आणि वर्जिन आयलंड्ससारख्या देशांतून चालवले जातात.
मात्र, हे प्लॅटफॉर्म भारतात नोंदणीकृत नाहीत. विशेष म्हणजे यापैकी अनेक वेबसाइट आणि अॅप्सना इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, 2000 च्या कलम 79(3)(b) अंतर्गत पब्लिक अॅक्सेसमधून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा मोठा धोका मानला जात आहे.
—
भारतात फक्त ५० नोंदणीकृत प्रोव्हायडर
FIUच्या माहितीनुसार, सध्या भारतात केवळ ५० डिजिटल अॅसेट सर्व्हिस प्रोव्हायडर नोंदणीकृत आहेत. बाकीचे विदेशी प्लॅटफॉर्म भारतीय कायद्याच्या चौकटीबाहेर आहेत. त्यामुळे अशा प्लॅटफॉर्मवर तोटा झाल्यास गुंतवणूकदारांना कोणतेही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही.
नोटिस मिळालेल्या प्लॅटफॉर्ममध्ये Bitmex, BingX, LBank, YouHodler, Fimex, Zoomex, CoinW, LCX यांसारखी नावे आहेत. याआधीही FIU ने अनेक वेळा अशा अनरजिस्टर्ड प्लॅटफॉर्मविरुद्ध कारवाई केली आहे.
—
नोटिसा मिळालेल्या २५ प्लॅटफॉर्मची यादी
1. हुइओन (Huione)
2. बीसी.गेम (BC.Game)
3. पॅक्सफुल (Paxful)
4. चेंजली (Changelly)
5. सीईएक्स.आयओ (CEX.IO)
6. एल बँक (LBank)
7. यूहोडलर (YouHodler)
8. बिंगएक्स (BingX)
9. प्राईमएक्सबीटी (PrimeXBT)
10. बीटीसीसी (BTCC)
11. कॉइनेक्स (Coinex)
12. रेमिटानो (Remitano)
13. पोलोनीएक्स (Poloniex)
14. बिटमेक्स (BitMex)
15. बिट्रू (Bitrue)
16. एलसीएक्स (LCX)
17. प्रोबिट ग्लोबल (Probit Global)
18. बीटीएसई (BTSE)
19. हिट बीटीसी (HIT BTC)
20. लोकलकॉइनस्वॅप (LocalCoinSwap)
21. असेंडएक्स (AscendEx)
22. फेमेक्स (Phemex)
23. झूमेक्स (ZooMex)
24. कॉइनकोला (CoinCola)
25. कॉइनडब्ल्यू (CoinW)
—
यूआरएल ब्लॉक करण्याची शिफारस
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाला या प्लॅटफॉर्मचे यूआरएल ब्लॉक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवर होईल, कारण अशा प्लॅटफॉर्मद्वारे ट्रेडिंग करणे आणखी कठीण होऊ शकते.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना
केवळ भारतात नोंदणीकृत आणि नियमनबद्ध प्लॅटफॉर्मवरच पैसा लावावा. अन्यथा तुमची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते.
