Home » इतिहास घडवणारा वैभव सूर्यवंशी! विराट-रोहितलाही न जमलेला विक्रम केवळ १४व्या वर्षी आपल्या नावावर.

इतिहास घडवणारा वैभव सूर्यवंशी! विराट-रोहितलाही न जमलेला विक्रम केवळ १४व्या वर्षी आपल्या नावावर.

RR vs GT: आयपीएलच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने असं काही करून दाखवलं, जे आजवर विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांनाही जमलं नाही. त्याने नेमकं काय केलं, ते जाणून घेऊया…

वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम
कोहली-रोहितलाही अपयश आलेला रेकॉर्ड वैभवने केला पार
फक्त १४व्या वर्षी आयपीएलमध्ये विक्रमांची मालिका

जयपूर : अवघ्या १४ वर्षांचा असलेला राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. आजवर भारताच्या कोणत्याही खेळाडूला न जमलेला विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात त्याने केवळ ३८ चेंडूत १०१ धावांची आक्रमक खेळी करत संघाला आठ विकेट्सनी मोठा विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने सात चौकार आणि तब्बल ११ षटकारांची आतषबाजी केली.

फटक्यांच्या पावसात रेकॉर्डांची बरसात
वैभव जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हाच त्याच्या फटक्यांनी स्टेडियम दणाणून गेलं. त्याने मोहम्मद सिराजवर षटकार मारत खेळाची सुरुवात केली. पहिल्याच क्षणी वाटलं की हा मुलगा काहीतरी वेगळं करणार आहे. आणि तसंच घडलं. फक्त १७ चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने धमाकेदार सुरुवात केली आणि नंतर थांबला नाही.

सर्वात वेगवान शतक आणि नवा युवा विक्रम
वैभवने आपलं शतक केवळ ३५ चेंडूत पूर्ण करत आयपीएलमधील सर्वात जलद शतक करणारा भारतीय ठरला. इतक्या कमी चेंडूत शतक करणं भारताच्या कोणत्याही खेळाडूला अद्याप जमलेलं नाही. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडूही ठरला आहे.

पहिल्याच मोसमात वादळी आगमन
हा वैभवचा पहिलाच आयपीएल मोसम आहे, आणि त्यातच त्याने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका सामन्यात ११ षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय बनला आहे. गुजरातच्या कोणत्याही गोलंदाजाला त्याने संधी दिली नाही आणि सातत्याने आक्रमक फलंदाजी करत नवा इतिहास घडवला.

हाच सुर सुरू राहिला, तर क्रिकेट विश्वाला लवकरच एक नवा सुपरस्टार मिळाल्याशिवाय राहणार नाही.

IPL
VAIBHAV #IPL