Home » न्युज पेपर असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांनी फेर निवड

न्युज पेपर असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांनी फेर निवड

जयपुर- असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांची फेर निवड करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला यांनी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली.
संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दिनांक 27 एप्रिल रोजी दुसरा दिवस होता या अधिवेशनामध्ये राजस्थान अध्यक्ष गोपाल गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर राष्ट्रीय महासचिव शंकर कटीरा यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष केडी चंडोला यांनी नंतर बैठकीची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशभरातील विविध राज्यांच्या राज्याध्यक्ष पदाच्या नेमणुका जाहीर केल्या. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्याध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांची फेर निवड करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली .
यावेळी अधिवेशनास उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील सर्व सदस्यांनी टाळ्याच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले.‌.
व नंतर प्रत्यक्ष भेटून प्रदीप कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.
या समारोप प्रसंगी छाबडा सर, डॉक्टर अमृता मौर्य यांची समायोजित भाषणे झाले.
राष्ट्रीय कार्यकारिणी व राष्ट्रीय कार्यकारणीतील इतर सदस्यांची घोषणा एक आठवड्याच्या आत करण्यात येईल असे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष चंदोला यांनी यावेळी बोलताना सांगितले.