म्हाडा लॉटरी 2025: घराच्या शोधात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सकारात्मक घडामोड समोर आली आहे. ठाणे आणि कल्याण परिसरात जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण विभागात तब्बल 4000 घरांसाठी भव्य लॉटरी जाहीर होणार आहे.
मुंबईसारख्या शहरात घर घेणं आजच्या घडीला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. साधे 1 BHK घर विकत घेण्यासाठी देखील लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती पाहता म्हाडा पुन्हा एकदा सामान्य जनतेसाठी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
लॉटरीमधील ठाणे-कल्याणचा मोठा वाटा
या बंपर लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याण परिसरात असतील. चितळसर येथे तयार केलेल्या सुमारे 1173 सदनिकांचा या योजनेत समावेश असेल, तर कल्याणमध्ये म्हाडा सुमारे 2500 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे.
2025-26 मध्ये मोठ्या प्रमाणावर गृहबांधणीचे लक्ष्य
म्हाडाने 2025-26 च्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये मिळून एकूण 19,497 घरांच्या बांधकामाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मुंबई मंडळात दिवाळीपूर्वी 5000 घरांची लॉटरी अपेक्षित
यावर्षी दिवाळीच्या आधी म्हाडा मुंबई विभागात सुमारे 5000 घरांची लॉटरी जाहीर करणार असल्याचे म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय इतर विभागांमध्येही घरांच्या बांधकामाला गती मिळत असून, लवकरच त्या लॉटऱ्याही जाहीर होणार आहेत.
स्रोत: Maharashtra niropya