झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंडी जनता मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांचे सोमवारी सकाळी ८:५६ वाजता निधन झाले. ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांचे पार्थिव शरीर आज झारखंडमध्ये आणण्यात आले असून, ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रामगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गाव नेमरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रांची व विधानसभा परिसरात अंतिम दर्शनाची व्यवस्था
शासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिबू सोरेन यांचे पार्थिव सर्वप्रथम रांची येथील मोरहाबादीतील निवासस्थानी ठेवले जाईल. मंगळवारी सकाळी झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यालयात सार्वजनिक अंतिम दर्शनासाठी ते ठेवण्यात येणार आहे.
यानंतर त्यांचे पार्थिव झारखंड विधानसभा परिसरात नेले जाईल, जेथे लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करतील.
