Ahmedabad Air India Plane Crash अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून त्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 लोक होते. दुपारी 1 ते 2 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील विमानात होते. विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण घेतले आणि केवळ दोन मिनिटांतच ते क्रॅश झाले.
महत्वाची ठळक माहिती:
एअर इंडिया विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते
विमानात 53 ब्रिटिश नागरिक उपस्थित
एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स
गृहमंत्री अमित शहा अहमदाबादकडे रवाना
डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – गुजरातमधील अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे विमान अचानक कोसळले. या विमानात एकूण 242 प्रवासी व क्रू होते. हा अपघात दुपारी 1 ते 2 वाजेच्या दरम्यान झाला असल्याची माहिती आहे.
AI-171 क्रमांकाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही होते. या अपघाताचे दृश्य अतिशय भयावह असून फोटो पाहून अंगावर काटा येतो. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाहा या अपघाताचे काही चित्रे…
विमान कोसळण्याआधी पायलटने दिला होता “MAYDAY… MAYDAY…” सिग्नल; काय आहे त्याचा अर्थ?
Live Updates:
पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली
BSF आणि NDRFच्या टीम घटनास्थळी रवाना
MAYDAY कॉल दरम्यान पायलटने कोणाशी संपर्क साधला?