Home » अहमदाबाद विमान दुर्घटना: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी विमानात होते उपस्थित; प्रवाशांची यादी जाहीर

अहमदाबाद विमान दुर्घटना: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी विमानात होते उपस्थित; प्रवाशांची यादी जाहीर

अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच अपघातग्रस्त झाले. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही उपस्थित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विमानतळ बंद, रुग्णालयात वाढलेली गर्दी

एअर इंडिया विमानाच्या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे.

सिव्हिल रुग्णालयाच्या शवगृहाजवळ रांगेत उभ्या असलेल्या अॅम्ब्युलन्समुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.

अपघातग्रस्त विमानात १६९ भारतीय नागरिक होते, अशी माहिती मिळाली आहे.

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – गुजरातच्या अहमदाबाद येथून एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान कोसळले.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, विमानात 242 प्रवासी होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही या प्रवाशांमध्ये असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *