Home » वारी पंढरीची ज्ञानगंगा अशोक ची दिंडी संपन्न

वारी पंढरीची ज्ञानगंगा अशोक ची दिंडी संपन्न

प्रगतीनगर – अशोक सहकारी साखर कारखाना संचलित माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या संकल्पनेतून व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आर्ट्स अँड कॉमर्स प्रगतीनगर येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. प्रारंभी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन प्राचार्य संपत देसाई यांच्या हस्ते संपन्न होऊन आरती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य व रिंगण नृत्य सादर केले. विठ्ठल नामाचा गजर करत मोठ्या भक्ती भावाने पालखी काढण्यात आली. प्रती पंढरपूरची उबेहूब दिंडी अशोकनगर फाटा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर बोर्डे आश्रम येथे काढण्यात आली. याठिकाणी आरती होऊन विद्यार्थ्यांनी लेझीम व रिंगण नृत्य सादर केले. याप्रसंगी आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शेवटी प्राचार्य श्री.देसाई यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन कौतुक केले व विद्यार्थ्यांना उपवासाचे लाडू वाटप केले. शेवटी प्रा.मोना हिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले