ब्रिटनमध्ये प्रसिद्ध कॉल्डप्ले (Coldplay) बँडच्या कॉन्सर्टमध्ये रंगेहाथ पकडल्या गेल्यानंतर, टेक कंपनी अॅस्ट्रोनॉमरचे माजी सीईओ अँडी बायरन यांच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालांनुसार, अँडी यांनी एडल्ट वेबसाईट OnlyFans वर सुमारे 2.2 कोटी रुपये खर्च केले. यात त्यांनी केवळ सबस्क्रिप्शनच नाही, तर अनेक मॉडेल्ससोबत खासगी व्हिडिओ कॉल, कस्टम व्हिडिओ आणि वैयक्तिक कंटेंटसाठीही मोठी रक्कम मोजली.
एका मॉडेलवर 35 लाखांचा खर्च
‘द ब्लास्ट’च्या अहवालानुसार, अँडी यांनी 23 वर्षीय ओन्लीफॅन्स मॉडेल सोफी रेनसोबत केवळ व्हिडिओ कॉलसाठी जवळपास ₹35 लाख खर्च केले. बायरन यांच्या पत्नीने शेअर केलेल्या खासगी मेसेजमधून उघड झाले की अँडी गुप्त इंस्टाग्राम अकाउंटद्वारे सोफीशी संपर्क साधत आणि कॉलचे वेळापत्रक ठरवत.
सोफी रेन हिने थेट अँडीचे नाव घेतले नसले तरी तिने कॉल्डप्ले कॉन्सर्टचे कौतुक करत म्हटले, “फसवणूक करणारे लोक सर्वात वाईट असतात. त्यांच्या सत्याचा उलगडा हा त्या कॉन्सर्टमुळेच झाला.”
आणखी एका मॉडेलचा आरोप
ओन्लीफॅन्स ग्रुप बॉप हाऊस (Bop House) ची लीडर कॅमिला अराउजो हिने दावा केला की अँडीने फक्त सोफीवरच नव्हे, तर अनेक इतर मुलींवरही मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
16 जुलै रोजी ब्रिटनमधील कॉल्डप्लेच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान, अँडी बायरन आणि एचआर हेड क्रिस्टिन कॅबॉट हे एकमेकांच्या जवळिकेत असतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि आर्थिक खर्चाविषयीचे अनेक खुलासे एकामागोमाग समोर येत आहेत.
