Home » सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी झेप, चार नव्या प्रकल्पांना मंजुरी; ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये ₹४५९४ कोटींची गुंतवणूक

सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी झेप, चार नव्या प्रकल्पांना मंजुरी; ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये ₹४५९४ कोटींची गुंतवणूक

 

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वृद्धीसाठी ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पंजाब येथे ४५९४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह चार नव्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या सहा प्रकल्पांव्यतिरिक्त या नव्या प्रकल्पांमुळे भारताची सेमीकंडक्टर उत्पादन क्षमता आणखी बळकट होणार आहे. सरकार या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.

 

सरकारने सांगितले की, SiCSem, कॉण्टिनेंटल डिव्हाइस इंडिया (CDIL), 3D ग्लास सोल्युशन्स आणि अॅडव्हान्स्ड सिस्टिम इन पॅकेज (ASIP) टेक्नॉलॉजीज यांच्या प्रकल्पांमुळे सुमारे २,०३४ कौशल्याधारित रोजगार आणि अनेक अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.

 

या मंजुरीनंतर, सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत प्रकल्पांची संख्या १० वर पोहोचली असून, हे सहा राज्यांमध्ये मिळून जवळपास ₹१.६० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे द्योतक आहे.

 

SiCSem आणि 3D ग्लास ओडिशात आपली सुविधा उभारतील.

 

CDIL पंजाबमध्ये उत्पादनाचा विस्तार करेल.

 

ASIP आंध्र प्रदेशात उत्पादन प्रकल्प उभारेल.

 

 

SiCSem ब्रिटनस्थित Clas-SiC वेफर फॅब सोबत मिळून भारतातील पहिले व्यावसायिक कंपाउंड सेमीकंडक्टर फॅब उभारणार आहे. 3D ग्लास सोल्युशन्स आधुनिक पॅकेजिंग व एम्बेडेड ग्लास सब्सट्रेट प्लांट उभारेल, तर ASIP दक्षिण कोरियाच्या APACT सोबत मिळून सेमीकंडक्टर पॅकेज तयार करेल. CDIL च्या विस्तारामुळे उच्च क्षमतेची उपकरणे तयार होणार आहेत.

 

सरकारने नमूद केले की हे प्रकल्प दूरसंचार, ऑटोमोबाईल, डेटा सेंटर, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या मागणीला पुरवठा करतील, ज्यामुळे “आत्मनिर्भर भारत” मोहि

मेला गती मिळेल.