
जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गोदामाची साठवणूक क्षमता वाढवावी -पणनमंत्री जयकुमार रावल
पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आढावा बैठक संपन्न पुणे, दि. ९ : राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा…