Home » एशिया कप 2025 : श्रेयस अय्यरपासून के.एल. राहुलपर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंना भारतीय संघातून वगळले

एशिया कप 2025 : श्रेयस अय्यरपासून के.एल. राहुलपर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंना भारतीय संघातून वगळले

 

एशिया कप 2025 साठी मंगळवारी 15 जणांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला. यासाठी बीसीसीआय मुख्यालयात बैठक झाली. मुसळधार पावसामुळे बैठक सुरू होण्यास उशीर झाला. बैठकीनंतर मुख्य निवडकर्ता अजीत अगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेसमोर आले. त्यावेळी संघातील 15 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली.

 

गिलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी

 

शुभमन गिलला संघाचा उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले. तसेच, आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करूनही रिंकू सिंगवर निवडकर्त्यांनी विश्वास दाखवला आहे. इंग्लंड दौऱ्यात तीन कसोट्यांमध्ये खेळलेला जसप्रीत बुमराह आधीच उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते आणि त्यालाही या संघात स्थान मिळाले आहे.

 

ज्येष्ठ खेळाडूंची निराशा

 

भारतीय संघ जाहीर होताच काही नामांकित खेळाडूंना संधी न मिळाल्याने त्यांची निराशा झाली आहे. या यादीत यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, विकेटकीपर ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे.

 

मुख्य निवडकर्ता अजीत अगरकर यांनी सांगितले, “श्रेयस अय्यरला वगळणे हे दुर्दैवी आहे. यात त्याची चूक नाही, आमचीही नाही. त्याला योग्य संधीची प्रतीक्षा करावी लागेल.” यशस्वी जयस्वालला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तो पूर्णपणे फिट नसल्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत गाजवलेला मोहम्मद सिराज यालाही स्थान मिळालेले नाही. तर चहलचे नावही संघाबाहेर राहिले आहे.

 

 

 

एशिया कप 2025 साठी भारताचा संघ

 

सूर्यकुमार यादव (कर्णधार)

 

शुभमन गिल (उपकर्णधार)

 

अभिषेक शर्मा

 

तिलक वर्मा

 

हार्दिक पांड्या

 

शिवम दुबे

 

अक्षर पटेल

 

जितेश शर्मा (विकेटकीपर)

 

जसप्रीत बुमराह

 

वरुण चक्रवर्ती

 

अर्शदीप सिंह

 

कुलदीप यादव

 

संजू सॅमसन (विकेटकीपर)

 

हर्षित राणा

 

रिंकू सिंग

 

 

 

 

राखीव खेळाडू (स्टँडबाय)

 

प्रसिद्ध कृष्णा

 

यशस्वी जयस्वाल

 

वॉशिंग्टन सुंदर

 

रियान पराग

 

ध्रुव जुरेल