Home » “आता अजून काय सिद्ध करावं लागेल?…”, आर. अश्विनचा संताप; यशस्वी जायसवालला संघातून वगळल्याबद्दल निवड समितीवर टीका

“आता अजून काय सिद्ध करावं लागेल?…”, आर. अश्विनचा संताप; यशस्वी जायसवालला संघातून वगळल्याबद्दल निवड समितीवर टीका

 

Asia Cup 2025 साठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. यातून युवा सलामीवीर यशस्वी जायसवालला वगळल्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. दरम्यान, शुभमन गिलची पुनरागमनासह उपकर्णधारपदी निवड झाली. मात्र, या निर्णयावरून माजी ऑफस्पिनर आर. अश्विनने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, यशस्वीला वगळल्याने त्याच्या खेळण्याच्या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो.

 

 

 

ठळक मुद्दे :

 

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून

 

यशस्वी जायसवालला संघातून वगळल्यावर आर. अश्विनची नाराजी

 

“हा निर्णय करिअरवर परिणाम करणारा ठरू शकतो” – अश्विन

 

 

 

 

बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित अगरकर यांनी जाहीर केलेल्या संघामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे युवा सलामीवीर यशस्वी जायसवालचा अपवाद.

 

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतासाठी बॅकअप ओपनर म्हणून निवड झालेला जायसवाल आशिया कप 2025 च्या संघात नसल्याने चाहत्यांसह माजी खेळाडूंनाही आश्चर्य वाटले.

 

शुभमन गिलला मात्र पुनरागमनासह उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण या निर्णयावरून आर. अश्विनने सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त करत निवड

समितीवर सवाल उभे केले.