मुंबईत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर मोठे ट्रॅफिक जाम झाले आहेत तर लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कुर्ल्यातील मिठी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने जवळपास ३५० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शासनाने शाळा, कॉलेज आणि शासकीय कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
मुसळधार पावसाचा इशारा
मायानगरी मुंबईत मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाचा धडाका सुरू आहे. बहुतांश भागांत पाणी साचल्यामुळे रस्ते तळ्यासारखे झाले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्याने लोकल ट्रेनची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मिठी नदीचा धोका, रहिवाशांचे स्थलांतर
कुर्ला परिसरातून वाहणारी मिठी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. नदीकाठच्या वस्त्यांमधील सुमारे ३५० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
शाळा-काॅलेजांना सुट्टी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. फक्त ६ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे सरकारने शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्याची विनंती करण्यात आली आहे.
पावसामुळे रेड अलर्ट
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण कोकण किनाऱ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
लोकल व विमानसेवा विस्कळीत
रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कुर्ला दरम्यानच्या सर्व लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्ला ते सायन दरम्यानची सेवा देखील बंद आहे.
तसेच, खराब हवामानामुळे विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावरील ८ उड्डाणे वळवण्यात आली असून अनेक फ्ला
इट्स उशिरा चालू आहेत.


