स्टार प्लसवर प्रसारित झालेला लोकप्रिय टीव्ही शो ‘किस देश में है मेरा दिल’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत हीर मानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अदिती गुप्ता (Additi Gupta) त्या काळी घराघरात पोहोचल्या होत्या.
१७ वर्षांनंतर बदलला अदिती गुप्ताचा लुक
२००८ मध्ये या मालिकेची सुरुवात झाली होती आणि काही वर्षे ती प्रचंड लोकप्रिय ठरली. हीर आणि प्रेमची प्रेमकथा त्या काळी सगळ्यांचीच आवडती बनली होती. अदिती गुप्ताने साकारलेली हीरची साधी, निरागस भूमिका प्रेक्षकांना भलतीच भावली होती.
आज १७ वर्षांनी अदितीचा लुक पूर्णपणे बदलून गेला आहे. आधी साधेपणासाठी ओळखली जाणारी हीर आता खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारात दिसते. तिच्या इंस्टाग्रामवरील फोटो पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.
वैयक्तिक आयुष्य
अदिती गुप्ताने २०१८ मध्ये कबीर चोप्रासोबत लग्न केले. त्या लग्नामुळेही ती बऱ्याच चर्चेत राहिली होती.
एक काळ असा होता की अदिती गुप्ता छोट्या पडद्यावरील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र सध्या तिने अभिनयाला विराम दिला आहे. तिला शेवटचं २०१९ मध्ये ‘धड़कन जिंदगी की’ या मालिकेत पाहण्यात आलं होतं. तिच्या इतर प्रसिद्ध मालिकांमध्ये किस देश में है मेरा दिल, पुनर्विवाह, ये है आशिकी, कबूल है यांचा समावेश आहे.



