Home » पुतिन यांच्या 73 व्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींचा फोन; दोन्ही देशांच्या संबंधांवर झाली चर्चा

पुतिन यांच्या 73 व्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींचा फोन; दोन्ही देशांच्या संबंधांवर झाली चर्चा

पुतिन यांच्या 73 व्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींचा फोन; दोन्ही देशांच्या संबंधांवर झाली चर्च

 

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणात भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच धोरणात्मक भागीदारीला प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला.

 

मंगळवारी, म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी, पुतिन यांनी आपला 73 वा वाढदिवस साजरा केला. या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा देत उत्तम आरोग्य आणि सतत यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे निवेदन

रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पुतिन यांच्या आगामी भारत दौऱ्याच्या तयारीबाबतही चर्चा झाली.”

 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, डिसेंबरमध्ये होणाऱ्या 23 व्या भारत-रशिया शिखर परिषदेवेळी ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.

 

पुतिन यांची प्रतिक्रिया

राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र आणि सार्वभौम धोरण राबवत आहे. विशेषत: आर्थिक क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जगातील सर्वाधिक विकास दर असलेल्या देशांपैकी भारत आता प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये गण

ला जात आहे.”