Home » नव्या पिढीच्या उद्योजकतेचं उदाहरण – ‘द बाइटबूस्ट’ने गाठला यशाचा टप्पा

नव्या पिढीच्या उद्योजकतेचं उदाहरण – ‘द बाइटबूस्ट’ने गाठला यशाचा टप्पा

 

पुणे : डिजिटल मार्केटिंगच्या वाढत्या युगात दोन तरुण महिलांनी ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेला वास्तवात उतरवत अवघ्या दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘द बाइटबूस्ट’ (The Byteboost) या व्यवसायाने अवघ्या एका वर्षात 70 हून अधिक प्रकल्प पूर्ण करत उल्लेखनीय यश मिळवलं आहे.

 

डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, जाहिरात, सोशल मीडिया नेटवर्किंग आणि एसईओ (SEO) यांसारख्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘द बाइटबूस्ट’ने कमी कालावधीतच अनेक नामांकित ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. सध्या कंपनीकडे अनेक नवीन प्रकल्पांची जबाबदारी असून व्यवसाय जलद गतीने विस्तारत आहे.

 

या यशोगाथेमागे आहेत दोन शिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर महिला उद्योजिका, ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आवाहनाने प्रेरित होऊन नोकरीचा मार्ग सोडून स्वयंपूर्ण व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

 

तज्ज्ञांच्या मते, 2026 पर्यंत भारतातील डिजिटल मार्केटिंग उद्योगाचा आकार 70,000 कोटी रुपयांहून अधिक होईल, तर जागतिक स्तरावर ही वाढ अनेक पटींनी अधिक असेल. आजच्या काळात प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म गरजेचा ठरत असल्याने या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत.

 

‘द बाइटबूस्ट’च्या संस्थापकांचा विश्वास आहे की येत्या काळात डिजिटल मार्केटिंग क्षेत्र भारताच्या GDP वाढीत महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यांच्या या यशाने अनेक तरुणांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

 

👉 ‘द बाइटबूस्ट’चे यश हे केवळ व्यवसायाचे नाही तर भारतीय महिलांच्या उद्योजकीय सामर्थ्याचे द्योतक आहे.