नवी दिल्ली : संसदेत ‘वंदे मातरम्’वरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत ही चर्चा सुरू केल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून आज शाह यांनी अनेक ऐतिहासिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत काँग्रेसला धारेवर धरलं.
गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं,
“वंदे मातरम्’वर चर्चा त्याच्या निर्मितीच्या काळातही आवश्यक होती, स्वातंत्र्यलढ्यात होती, आजही आहे आणि 2047 मध्ये ‘महाभारत’ घडेल तेव्हाही राहील.”
—
बंकिमचंद्रांच्या रचनेचा संदर्भ देत ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट
शाह म्हणाले,
“शतकानुशतकं इस्लामिक आक्रमणं आणि नंतर इंग्रजांनी नवी संस्कृती थोपवण्याचा प्रयत्न—याच प्रतिकारातून बंकिम बाबूंनी ‘वंदे मातरम्’ची निर्मिती केली. मातृभूमीचा वंदन श्रीरामांनी, शंकराचार्यांनी आणि चाणक्यांनीही केलं; याहून मोठं काहीच नाही.”
—
नेहरू आणि इंदिरा गांधींवर गंभीर आरोप
पूर्व पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर टीका करताना त्यांनी म्हटलं—
“वंदे मातरम्’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षी नेहरूंनी त्याचे दोन भाग केले आणि दोन अंतऱ्यांपुरतंच मर्यादित ठेवलं. तुष्टीकरणाची सुरुवात तिथूनच झाली. तेच पाऊल न उचललं असतं तर देशाचा विभाजनापर्यंत प्रवास झाला नसता.”
शाह पुढे म्हणाले—
“वंदे मातरम्’च्या शताब्दी वर्षी इंदिरा गांधींनी ‘वंदे मातरम्’ म्हटल्याबद्दल लोकांना तुरुंगात टाकलं. आपत्कालात विरोधक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार—सगळ्यांना बंदिस्त करण्यात आलं; वृत्तपत्रांवर कुलपे लागली.”
—
काँग्रेसला संसदेत लक्ष्य
विरोधकांवर हल्ला चढवत शाह म्हणाले—
“काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या सदनात ‘वंदे मातरम्’ गाणं थांबवण्यात आलं होतं. 1992 मध्ये भाजप खासदार राम नाईक यांनी पुन्हा ‘वंदे मातरम्’ गाण्याचा विषय मांडला. त्या वेळी लालकृष्ण अडवाणी यांनी लोेकसभा अध्यक्षांना सदनात हे गीत पुन्हा
वाजवावं, अशी मागणी केली होती.”

