नाणेफेक गमावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली आणि त्यांनी स्फोटक सुरुवात केली. फिल साल्ट आणि विराट कोहली या जोडीने सुरुवातीपासूनच राजस्थानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत पाचव्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. राजस्थानला पॉवरप्लेमध्ये कोणताही यश मिळवता आलं नाही. मात्र सातव्या षटकात बंगळुरूला पहिला झटका बसला, जेव्हा सॉल्ट 61 धावांच्या एकूण धावसंख्येवर बाद झाला. त्याने 23 चेंडूंमध्ये 4 चौकार मारत 26 धावा केल्या
इंडियन प्रीमियर लीग 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पॉईंट्स टेबल मध्ये प्रथम.
इंडियन प्रीमियर लीग 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स — अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावरील पराभवांचा सिलसिला तोडला. मागील सलग तीन सामन्यांमध्ये अपयश आलेल्या रजत पाटीदारच्या संघाने एका हृदयस्पर्शी लढतीत जोरदार पुनरागमन करत राजस्थान रॉयल्सवर 11 धावांनी मात केली. पहिले फलंदाजी करताना, विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर बंगळुरूने 205 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांच्या दमदार खेळींनी राजस्थानला विजयाची आशा दाखवली. पण शेवटच्या टप्प्यावर जोश हेझलवूडने अप्रतिम गोलंदाजी करत सामन्याचा रुखच बदलून टाकला आणि बंगळुरूला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला.