Home » “चूक मान्य केली; भारतविरोधकांना आम्ही आश्रय देतो” — पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर कॅनडाचं कबूल

“चूक मान्य केली; भारतविरोधकांना आम्ही आश्रय देतो” — पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर कॅनडाचं कबूल

कॅनडाची गुप्तचर संस्था CSIS ने त्यांच्या वार्षिक अहवालात स्पष्ट केलं आहे की खालिस्तानी समर्थक दहशतवादी भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी, निधी उभारण्यासाठी आणि योजना आखण्यासाठी कॅनडाचा उपयोग करत आहेत. अहवालात म्हटलं आहे की हे खालिस्तानी अतिरेकवादी कॅनडाला एक बेस म्हणून वापरत आहेत.

CSIS ने बुधवार, दिनांक १८ जून रोजी आपला वार्षिक अहवाल जाहीर केला.

एएनआय, ओटावा — भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लगेचच कॅनडाने अखेर कबूल केलं आहे की खालिस्तानवाद्यांना त्यांच्या देशात आश्रय मिळालेला आहे.
कॅनडाची प्रमुख गुप्तचर संस्था कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (CSIS) ने पहिल्यांदाच अधिकृतरीत्या मान्य केलं आहे की खालिस्तानी अतिरेकवादी भारतात हिंसेचा प्रसार करण्यासाठी, आर्थिक पाठबळ उभारण्यासाठी आणि कट रचण्यासाठी कॅनडाच्या भूमीचा वापर करत आहेत.

CSIS च्या अहवालात स्पष्ट शब्दांत नमूद केलं आहे,
“खालिस्तानी अतिरेकवादी मुख्यत्वे भारतातील हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठी, निधी गोळा करण्यासाठी आणि योजनांची आखणी करण्यासाठी कॅनडाचा आधार घेत आहेत.”

भारताचे सातत्याने दिलेले इशारे अखेर खरे ठरले

भारत अनेक वर्षांपासून कॅनडाला सतर्क करत आहे की त्याच्या भूमीवर खालिस्तानी अतिरेकवाद्यांचे तळ तयार झाले आहेत. मात्र, कॅनडाने याकडे दुर्लक्ष केलं. आता मात्र CSIS च्या अहवालात हे नमूद आहे की कॅनडा भारतविरोधी गटांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थळ बनला आहे.

संस्थेने पुढे सांगितलं की,
“आता जाऊन आम्हाला उमगलं आहे की भारताने जी चिंता वर्षानुवर्षे व्यक्त केली होती, ती खरीच होती.”

तसंच अहवालात हे देखील नमूद करण्यात आलं आहे की १९८० च्या दशकात कॅनडामधील राजकीय प्रेरणेतून प्रेरित हिंसक उग्रवाद (Political Motivated Violent Extremism – PMVE) चा धोका कॅनडाच्या स्वतःच्या भूमीवरून उद्भवलेला होता.