नवी दिल्ली – मागील काही महिन्यांपासून डिफेन्स सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर झपाट्याने वधारत आहेत. विशेषतः भारत-पाक संघर्ष आणि सध्या सुरू असलेले इराण-इस्रायल युद्ध यामुळे संरक्षण व दारुगोळा बनवणाऱ्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रोकरेज हाउस आनंद राठी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस यांनी BEML (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या सरकारी कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
वंदे भारतसह मेट्रो कोच बनवणारी कंपनी
BEML ही कंपनी केवळ संरक्षण उत्पादनेच नाही, तर वंदे भारत ट्रेन, मेट्रो व रेल्वे कोचही बनवते. या कंपनीने गेल्या एका महिन्यात 30% चा परतावा दिला आहे आणि मागील पाच वर्षांत तब्बल 600% रिटर्न नोंदवला आहे.
ब्रोकरेजचा सल्ला आणि टार्गेट किंमत
आनंद राठी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसनुसार BEML चा शेअर ₹4550 ते ₹4450 च्या दरम्यान खरेदी करावा आणि यासाठी त्यांनी ₹5725 ची टार्गेट किंमत दिली आहे. सध्या हा शेअर सुमारे ₹4650 दराने व्यवहार करत असून आजच्या सत्रात त्यात 8% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.
डिफेन्स सेक्टरमधील अपट्रेंड
ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, संरक्षण क्षेत्रात सातत्याने सकारात्मक हालचाल दिसत आहे. BEML च्या शेअरमध्येही मजबूत तेजीचे संकेत असून साप्ताहिक चार्टवर ब्रेकआउट झाल्याने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कंपनीचा मुख्य व्यवसाय
BEML लिमिटेड भारतातील आघाडीची खाणकाम व बांधकाम उपकरणे उत्पादक कंपनी आहे. ती संरक्षण दलांसाठी वाहन निर्मिती करते तसेच मेट्रो आणि रेल्वे कोच बनवते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये हायड्रॉलिक मशीन, बुलडोजर, व्हील लोडर, डंप ट्रक, मोटर ग्रेडर, टायर हँडलर यांचा समावेश आहे.
