Home » रोहन लहर 3 मध्ये 79वा स्वातंत्र्यदिन साजरा – समाजातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

रोहन लहर 3 मध्ये 79वा स्वातंत्र्यदिन साजरा – समाजातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

रोहन लहर 3 मध्ये 79वा स्वातंत्र्यदिन साजरा – समाजातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे – रोहन लहर 3 या गृहनिर्माण सोसायटीत स्थापनेपासून सर्व पारंपरिक सण-उत्सव मोठ्या सन्मानाने व अभिमानाने साजरे केले जातात. याच परंपरेला पुढे नेत आज 15 ऑगस्ट 2025, भारताच्या 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला.

 

ध्वजारोहण सोहळ्याला सोसायटीतील अनेक सदस्यांनी हजेरी लावली. यामध्ये स्नेहल येवले, केदार बारीडे, धीरज कबीर, दयानंद बोटे, शेखर क्षीरसागर, अभिनव गुप्ता, मनीष आर्गडे, दीपक हांदोर, अमोल वाणी, सौरभ दशपुत्रे, रुपेश पोखळे, प्रफुल्ल इलेपल्ली यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते.

 

सोहळ्यानंतर राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला. समाजातील सदस्यांनी एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. रोहन लहर 3 ने पुन्हा एकदा एकतेचा आणि देशप्रेमाचा संदेश दिला.