बारामती, दि. 26: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून नगरपरिषदेला अत्याधुनिक नविन शववाहिनी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली आहे.
यापूर्वी शहरात वापरात असलेली शववाहिका जुनी व मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे अंत्यविधीच्या वेळी शववहन करताना अडचणी निर्माण होत होत्या. या नवीन शववाहिनीच्या माध्यमातून शहरातील मृत व्यक्तींच्या शव वहनाचे काम नगरपरिषद व राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार असून सन्मानपूर्वक शववहन होण्यास मदत होणार आहे.
नगरपरिषदेच्या हद्दीत ही सेवा मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याकरिता संजय प्रभुणे-९७६४४४१४०९ आणि चालक राजेश लोहाट- ९७६४४४१४४५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. भुसे यांनी केले आहे.
