उत्तर प्रदेशात बर्ड फ्लूचा धोका वाढल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. रामपुर जिल्यातील एका पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर प्राणी उद्यान, पक्षी विहार आणि पोल्ट्री फार्मवर काटेकोर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच कर्मचाऱ्यांना पीपीई किट व आवश्यक प्रशिक्षण देण्यास, तसेच राष्ट्रीय संस्थांशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगितले आहे.
रामपुरच्या चंदेन गावात कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर पशुपालन विभागाने नमुने तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोगशाळेत चाचणी झाल्यावर बर्ड फ्लूचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांनी सर्व पोल्ट्री फार्मवर मानकांनुसार देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
