Home » १५ ऑगस्टला ‘चहापाणी अमृततुल्य अँड मिसळवाला’चे भव्य उद्घाटन

१५ ऑगस्टला ‘चहापाणी अमृततुल्य अँड मिसळवाला’चे भव्य उद्घाटन

 

१५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, स्थानिक आमदार श्री. शंकर मांडेकर आणि श्री. सुनील खुळे यांच्या उपस्थितीत ‘चहापाणी अमृततुल्य अँड मिसळवाला’चे भव्य उद्घाटन होणार आहे.

ही नवी खाद्यपेढी उभारण्यामागे आहेत तीन भाऊ – ज्यांनी आपल्या आयुष्यातील सुरुवातीच्या संघर्षातून वाट काढत मेहनतीच्या जोरावर यश मिळवले. व्यवसायाची उत्तम समज आणि चिकाटीमुळे त्यांनी आधी बूटांची दुकान, नंतर किराणा दुकान यशस्वीपणे उभारले. त्या दोन्ही दुकानांच्या यशानंतर आता हे तीनही भाऊ खाद्यविश्वात पाऊल ठेवत आहेत.

खवय्ये असलेले हे तिन्ही भाऊ स्वतः स्वादिष्ट पदार्थ बनवण्यात पटाईत आहेत. लोकांना रुचकर जेवण बनवून देणे हा त्यांचा छंद असून, आता हा छंद व्यवसायात रुपांतरित होणार आहे.

‘चहापाणी अमृततुल्य अँड मिसळवाला’ येथे ग्राहकांना उत्कृष्ट चहा, मिसळ आणि इतर चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिकांना उत्तम खाद्यपदार्थांची नवी मेजवानी मिळणार आहे.