महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! पुढील चार महिन्यांत होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका – सुप्रीम कोर्टाचा आदेश
दिल्ली | प्रतिनिधी – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की येत्या चार महिन्यांत या निवडणुका पार पडाव्यात. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय? ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 2022 मधील…
