दिल्लीमध्ये शानदार घर खरेदीची संधी! डीडीए घेऊन येत आहे रेडी टू मूव फ्लॅट्स; जाणून घ्या 2BHK ते 4BHK दर
DDA Housing Scheme 2025 : दिल्लीतील प्राईम लोकेशन्सवर शानदार फ्लॅट खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) 26 ऑगस्ट रोजी प्रीमियम गृहनिर्माण योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण 250 फ्लॅट्स उपलब्ध असतील. हे फ्लॅट वसंत कुंज, द्वारका आणि रोहिणी सारख्या प्राईम लोकेशन्सवर असणार आहेत. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती…
—
डीडीए हौसिंग स्कीम 2025 : 26 ऑगस्टपासून नोंदणी सुरू
दिल्लीतील वसंत कुंज, द्वारका, रोहिणी, जसोलासह प्राईम लोकेशन्सवर एचआयजी, एमआयजी आणि ईएचएस श्रेणीतील 250 फ्लॅट्स उपलब्ध
सर्व फ्लॅट रेडी टू मूव असतील, इच्छुकांना साइटवर जाऊन पाहण्याची संधी
या योजनेसाठी उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मागील महिन्यातच हिरवा कंदील दाखवला होता
डीडीए या योजनेत निवासी फ्लॅट्ससोबत कार/स्कूटर गॅरेजही उपलब्ध करून देणार आहे. ही नोंदणी ई-लिलाव प्रणालीद्वारे होणार असून, सर्वाधिक बोली लावणाऱ्यास गॅरेज मिळेल.
—
कोणत्या भागात आहेत फ्लॅट्स?
एचआयजी फ्लॅट्स : वसंत कुंज, जसोल (पॉकेट 9B), द्वारका (सेक्टर 19B) – 39 फ्लॅट्स
एमआयजी फ्लॅट्स : जहांगीरपुरी, नंद नगरी, द्वारका, पीतमपुरा – 48 फ्लॅट्स
एलआयजी फ्लॅट्स : रोहिणी – 22 फ्लॅट्स
ईएचएस फ्लॅट्स : नसीरपूर (द्वारका) – 66 फ्लॅट्स
एसएफएस श्रेणी-दोन फ्लॅट्स : रोहिणी सेक्टर 18 आणि शालीमार बाग – प्रत्येकी 1 फ्लॅट
याशिवाय पीतमपुरा येथे 16 कार गॅरेज तर मॉल रोड आणि अशोक विहार येथे 51 स्कूटर गॅरेज उपलब्ध राहतील.
—
DDA Flat Scheme 2025 : फ्लॅट्सचे दर किती असतील?
एचआयजी फ्लॅट्स : ₹1.64 कोटी – ₹2.54 कोटी
एमआयजी फ्लॅट्स : ₹60 लाख – ₹1.50 कोटी
एलआयजी फ्लॅट्स : ₹39 लाख – ₹54 लाख
एसएफएस फ्लॅट्स : ₹90 लाख – ₹1.07 कोटी
ईएचएस फ्लॅट्स : ₹38.70 लाख
कार/स्कूटर गॅरेज : ₹3.17 लाख – ₹43 लाख (स्थान व प्रकारानुसार)
—
नोंदणीपूर्वी पाहू शकणार फ्लॅट्स
प्रारंभी डीडीए ही योजना राखीबांधणीच्या दिवशी सुरू करणार होती, पण काही कारणामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली. 26 ऑगस्टपासून इच्छुक नागरिकांना नोंदणी करता येईल. फ्लॅट्स रेडी टू मूव असल्याने थेट पाहणी करण्याचीही संधी असेल.
ही योजना सुरू होताच डीडीएची चालू असलेली “आपलं घर आपलं आवास योजना” काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
डीडीए अधिकाऱ्यांच्या मते, ही योजना दिल्लीला उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक गृहनिर्माण पर्याय आणि संतुलित शहरी वातावरण असलेले जागतिक स्तरावरील शहर बनविण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. सर्व
फ्लॅट्स व गॅरेज हातोहात विकले जातील असा अंदाज वर्तवला जात आहे.
