Home » पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन्ह

पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन्ह

पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन्

 

पुणे शहरात गेल्या दोन वर्षांत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता आणि विशेषतः पुण्यातील एक्झिट पॉइंट्स खड्ड्यांनी व्यापलेले दिसतात. शहरात वाहतुकीचा बोजवारा, तुटके रस्ते आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते.

 

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची, पाणीपुरवठ्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी ही शासन व प्रशासनाची असते. परंतु पुण्यातील नागरिकांना याच मूलभूत सोयींसाठी झगडावे लागत आहे. रस्त्यांवरून प्रवास करताना जीव धोक्यात येतो, तर वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

 

दरम्यान, नागरिकांचा त्रास किती वाढला आहे याचे एक जिवंत उदाहरण समोर आले. पुण्यातील एका नागरिकाने आपल्या पाठीवर फलक लावून रस्त्यावर मोर्चा काढला ज्यावर लिहिले होते – “कोणी मला कर्ज द्याल का? मी खड्डे बुजवतो.” ही घटना प्रशासनासाठी मोठा धक्का आहे. लोकांचा संयम आता सुटत चालला आहे हे यातून स्पष्ट होते.

 

दररोज अपघातांची संख्या वाढते आहे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाही, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावर चालणेही धोकादायक झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवले आहेत.

 

प्रशासनाने कागदोपत्री रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले तरी प्रत्यक्षात काहीही काम होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण मूलभूत रस्ते दुरुस्तीवर कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत.

 

आता सरकार व प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व सुस्थितीत रस्ते उपलब्ध करून देणे हीच खरी गरज आहे. अन्यथा “पुणे महानगरपालिका व प्रशासनाचे डोळे केव्हा उघडणार?” हा प्रश्न कायम नागरिकांना विचा

रावा लागेल.