Home » “आतंकवादाचा रंग भगवा नसतो…” – मालेगाव स्फोटप्रकरणातून सुटलेनंतर साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया

“आतंकवादाचा रंग भगवा नसतो…” – मालेगाव स्फोटप्रकरणातून सुटलेनंतर साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया

 

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी निर्दोष ठरवल्यानंतर भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या आरोपांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.

 

त्यांनी म्हटलं की, चौकशी दरम्यान चुकीची माहिती न दिल्यामुळे त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप करत, “कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन त्यांनी मला त्रास दिला,” असं सांगितलं. त्यांनी ATS (दहशतवादविरोधी पथक) चे अधिकारीही यात सामील असल्याचे म्हटले.

 

“पोलीस कोठडीत छळ झाला, जबरदस्तीने नावे सांगायला लावली गेली”

 

भोपाल विमानतळावर माध्यमांशी बोलताना प्रज्ञा म्हणाल्या, “माझ्याकडून चुकीची माहिती पसरवायला सांगितली गेली होती, पण मी नकार दिला. त्यामुळे त्यांनी माझा जबर छळ केला.”

 

“हिंदू दहशतवादी ठरू शकत नाही”

 

त्यांच्या मते, “हिंदू आतंकवाद हे कधीही सिद्ध होऊ शकत नाही. काँग्रेसने नेहमी हिंदूंवर अन्याय केला. आम्ही आपल्या देशात आतंकवादी होऊच शकत नाही. जर दहशतवादाचा काही रंग असतोच, तर तो हरा आहे – कारण धर्म विचारून गोळ्या झाडणारे कोण होते?”

 

“परमबीर सिंग आणि ATS चा छळ”

 

साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, “परमबीर सिंग हा अत्यंत नीच दर्जाचा अधिकारी आहे. त्याने पदाचा गैरवापर करून मला छळले. केवळ तोच नाही, ATS चे इतर अधिकारीही यात सामील होते. मी २४ दिवस पोलीस कोठडीत होते आणि त्या काळात मला अमानुष अत्याचार सहन करावा लागला.”

 

“मोदी-योगी यांची नावे घ्यायला लावण्याचा प्रयत्न”

 

“पोलीस कोठडीत माझ्यावर मोठमोठ्या नेत्यांची नावे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मी त्यास नकार दिला, त्यामुळे त्यांनी माझा छळ केला. मला विशेषतः भागवतजी, मोदीजी, योगीजी आणि इंद्रेशजी यांची नावे घेण्यास सांगितले गेले होते,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

“काँग्रेसने तुष्टीकरणाच्या राजकारणातून हिंदूंवर अन्याय केला”

 

काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटलं, “काँग्रेसने मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणाचे राजकारण केले. त्यांनी हिंदूंना दुय्यम वागणूक दिली आणि भगवा व हिंदुत्वाला आतंकवादाशी जोडून अपप्रचार केला. हा एक मोठा कट होता.”

 

न्यायालयीन सुटकेनंतर पहिल्यांदाच भोपालमध्ये माध्यमांशी संवाद

 

स्मरणीय आहे की, 2008 च्या मालेगाव स्फोटप्रकरणात साध्वी प्रज्ञा यांच्यासह काही इतरांना अटक झाली होती. मात्र, नुकत्याच NIA न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे त्यांना निर्दोष मुक्त केले. सुटकेनंतर त्या प्रथमच भोपालमध्ये आल्या आणि पत्रकार परि

षदेत आपल्या व्यथा मांडल्या.