Home » भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अलर्टवर; ब्लॅकआउट आणि आणीबाणीमुळे गाड्या रद्द व विलंबित, यादी पाहा

भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अलर्टवर; ब्लॅकआउट आणि आणीबाणीमुळे गाड्या रद्द व विलंबित, यादी पाहा

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. सुरक्षा उपाययोजनांअंतर्गत रेल्वे विभागाने कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतीय लष्करी हालचालींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषत: लष्करी गाड्यांविषयी कोणतीही माहिती न देता तात्काळ वरिष्ठांना कळवण्यास सांगण्यात आले आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:

अनोळखी नंबरवरून येणारे कॉल उचलू नका.

लष्करी हालचाली किंवा गाड्यांबाबतची कोणतीही माहिती शेअर करू नका.

संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा.

अधिकृत संप्रेषण प्रक्रियेचे काटेकोर पालन करा.

ब्लॅकआउट आणि आपत्कालीन स्थितीमुळे रेल्वेसेवा प्रभावित

उत्तर पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, काही गाड्या सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावणार आहेत. जर तुम्ही 9 मे 2025 रोजी प्रवासाचे नियोजन करत असाल, तर नवीन वेळापत्रकाची नोंद घ्या.

रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशी किरण यांनी सांगितले की, “सध्याची परिस्थिती लक्षात घेता, काही गाड्यांना रद्द करणे व काहींच्या वेळेत बदल करणे अपरिहार्य झाले आहे.”

रद्द झालेल्या गाड्यांची यादी:

गाडी क्र. 14895: भगत की कोठी ते बाडमेर – रद्द

गाडी क्र. 14896: बाडमेर ते भगत की कोठी – रद्द

गाडी क्र. 04880: मुनाबाव ते बाडमेर – रद्द

गाडी क्र. 54881: बाडमेर ते मुनाबाव – रद्द

 

विलंबित गाड्यांची यादी:

गाडी क्र. 14807: जोधपूर – दादर एक्सप्रेस
9 मे रोजी 05:10 ऐवजी 08:10 वाजता, म्हणजे 3 तास उशिरा निघेल.

गाडी क्र. 14864: जोधपूर – वाराणसी सिटी एक्सप्रेस
9 मे रोजी 08:25 ऐवजी 11:25 वाजता, म्हणजे 3 तास उशिरा रवाना होईल.