Home » ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले पाक लष्कराचे पाच अधिकारी; भारतीय लष्कराकडून मोठा खुलासा.

ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले पाक लष्कराचे पाच अधिकारी; भारतीय लष्कराकडून मोठा खुलासा.

नवी दिल्ली | डिजिटल डेस्क: पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पंधरव्या दिवशी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या मोहिमेत भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत काही प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष बाब म्हणजे, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ अधिकारी हजर होते, अशी माहिती भारतीय लष्कराने पुराव्यांसह उघड केली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादी अड्ड्यांवर तडाखा

या मोहिमेत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांचे अनेक अड्डे लक्ष्य करण्यात आले. मुरीदके, बहावलपूर, सियालकोट आणि मुजफ्फराबाद येथे असलेल्या नऊ प्रमुख दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सशस्त्र दलांनी अचूक हल्ले केले. यामध्ये मसूद अजहरचा भाऊही ठार झाला होता.

दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी

भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. या अंत्यसंस्कारांमध्ये लष्कर कमांडर आणि अमेरिकेने घोषित केलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी अब्दुल रऊफने प्रमुख भूमिका बजावली होती.

प्रेस कॉन्फरन्समध्ये एक छायाचित्र दाखवण्यात आले ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट जनरल फैयाज हुसैन शाह, मेजर जनरल राव इमरान सरताज आणि ब्रिगेडियर मोहम्मद फुरकान शब्बीर हे अंत्यसंस्कारात सहभागी असल्याचे स्पष्ट दिसते. याशिवाय, वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. उस्मान अनवर आणि राजकारणी मलिक सोहैब अहमद भेरथ हे नमाज पठण करताना दिसून आले.

दहशतवाद्यांना दिला गेला राजकीय सन्मान

हे अंत्यसंस्कार संपूर्ण राजकीय सन्मानासह पार पडले. दहशतवाद्यांचे शव पाकिस्तानी झेंड्यांमध्ये लपेटले गेले होते. यामुळे पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांमधील साठगाठ पुन्हा एकदा उघड झाली आहे.

जैशचे मुख्य तळ उद्ध्वस्त

सात आणि आठ मेच्या रात्री सुरू झालेल्या या कारवाईमध्ये भारताने खासकरून तीन ठिकाणांना सर्वाधिक नुकसान पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते — बहावलपूरमधील मरकज सुभानअल्लाह, मुरीदके येथील मरकज तैयबा, आणि मुजफ्फराबादमधील मरकज सैयदना बिलाल. ही सर्व ठिकाणं गेल्या दोन दशकांतील भारतावरील बहुतेक दहशतवादी हल्ल्यांशी थेट संबंधित होती.

ही अड्डे मूळतः अफगाणिस्तानमधील सोव्हिएतविरोधी युद्धातून उगम पावलेल्या कट्टरपंथ्यांनी आणि आयएसआयच्या मदतीने स्थापन केली होती. त्यांना पाक लष्कर आणि स्थानिक पोलिसांकडून ओसामा बिन लादेनप्रमाणेच पाठबळ मिळत होते.

जैश अड्ड्यांवर भारतीय हत्यारांचा भेदक हल्ला

भारताने अत्यंत प्रबळ आणि आधुनिक हत्यारांचा वापर करत जैशच्या अड्ड्यांवर हल्ला चढवला. ही कारवाई केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर पाकिस्तानला स्पष्ट संदेश देणारी ठरली. या कारवाईमुळे दहशतवाद पोसणाऱ्या यंत्रणेत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

TERRORIST COUNTRY PAKISTAN