भारताच्या कसोटी संघाचे कर्णधार शुभमन गिल यांनी द ओव्हल कसोटी सामन्यात निर्णायक कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजचे भरभरून कौतुक केले आहे. सिराजने अंतिम डावात ५ बळी टिपत भारताला विजयाच्या मार्गावर नेले, तर प्रसिद्ध कृष्णानेही ४ महत्त्वाचे गडी बाद करत मोलाचा वाटा उचलला.
—
शुभमन गिलकडून मोहम्मद सिराजच्या खेळीचे जोरदार कौतुक
IND vs ENG: भारताची द ओव्हलमध्ये इंग्लंडवर निर्णायक मात
IND vs ENG: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली सिराजचा जलवा
IND vs ENG: सिराजने निर्णायक डावात टिपले पाच बळी
—
दबावातून विजयाकडे वाटचाल
द ओव्हलमध्ये अंतिम कसोटी सामन्याचा निर्णायक दिवस सुरु असताना सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मात्र, भारताने शेवटच्या दिवशी कमालीचा खेळ करत विजय खेचून आणला. यानंतर कर्णधार गिलने मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या सिराजसह प्रसिद्ध कृष्णाचाही विशेष उल्लेख केला. गिल म्हणाले, “सिराज आणि प्रसिद्धसारखे गोलंदाज असले की कर्णधाराची जबाबदारी सोपी होते.”
—
“कर्णधाराला हवे असे खेळाडू” – गिल
गिल पुढे म्हणाले, “दोन्ही संघांनी सर्वोत्तम खेळ केला. शेवटच्या दिवशी कोण जिंकेल याची कल्पनाही नव्हती. पण आम्हाला माहित होतं की इंग्लंड दबावात आहे आणि आम्ही तोच दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.”
ते पुढे म्हणाले, “सिराजसारखा गोलंदाज प्रत्येक कर्णधाराला हवा असतो. प्रत्येक ओव्हरमध्ये, प्रत्येक स्पेलमध्ये त्याने स्वतःला झोकून दिलं. २-२ ने मालिकेचा निकाल लागणं हा दोन्ही संघांच्या ताकदीचा आणि समतोलतेचा दाखला आहे.”
—
गिलच्या फलंदाजीवरही प्रकाश
शुभमन गिलने स्वतःच्या फलंदाजीबद्दलही सांगितले, “माझं ध्येय होतं की मी मालिकेतील सर्वोत्तम फलंदाज ठरावं – आणि हे गाठणं फार समाधान देणारं होतं. गेल्या सहा आठवड्यात मी बरेच शिकलो. तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या सुधारणा करण्यात वेळ गेला, पण आम्ही हार मानली नाही.”
—
शुभमन गिलचे विक्रमी कामगिरी
या मालिकेत गिलने ५ कसोटींतील १० डावांमध्ये ७५४ धावा केल्या. यामध्ये ४ शतकं आणि १ द्वि
शतक होते. त्याने सर्वोच्च धावा २६९ केल्या.
