सात वर्षांनंतर चीनच्या भूमीवर पाऊल ठेवताच घुमले ‘भारत माता की जय’चे नारे, पंतप्रधान मोदींचे रेड कार्पेटवर स्वागत
जपान दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या तियानजिन शहरात दाखल झाले. सात वर्षांनंतर चीनच्या भूमीवर पाऊल टाकल्याबरोबर त्यांचे रेड कार्पेट अंथरून पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आले. चीनी नागरिकांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या आकर्षक सादरीकरणांनी त्यांचे अभिनंदन केले. मोदी आता शांघाय सहकार संघटना (एससीओ) शिखर परिषदेतील सहभागासाठी तसेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगसह अनेक जागतिक नेत्यांशी…
