पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा अजित पवार यांच्याकडून आढावा पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेले प्रकल्प पुढील शंभर वर्षांचा विचार करुन नियोजित वेळेत पूर्ण करा –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्दे
मुंबई, दि. 2 :- पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकासप्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. राज्याच्या विकासाची ही कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन आखावीत. नियोजित वेळेत पूर्ण करावीत. सर्व कामे दर्जेदार असतील याची काळजी घ्यावी. केंद्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय, संपर्क ठेवून पंधराव्या वित्त आयोगाचा सर्व निधी वेळेत उपलब्ध होईल आणि चालू…
