शरद मोहोळ हत्याकांडाला नवा वळण; कथित सूत्रधार विठ्ठल शेलारच्या सुटकेचे उच्च न्यायालयाचे आदेश, पुणे पोलिसांना मोठा धक्का
पुणे: शहरातील गुन्हेगारी विश्व हादरवणाऱ्या शरद मोहोळ हत्या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. या खटल्यातील कथित मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल शेलार याची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अटकेदरम्यान कायदेशीर प्रक्रियेत त्रुटी झाल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला असून, त्यामुळे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. …
