नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा सुळसुळाट! वृद्धांची फसवणूक करून सायबर ठगांनी उकळले तब्बल 6 कोटी आणि 72 लाख
नाशिक : सायबर ठग आता लोकांना फसवण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नाशिकमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 6 कोटी आणि 72 लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये ठगांनी आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगून वृद्धांना धमकावले आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. याप्रकरणी…
