वाढत्या गुन्हेगारीपासून कौटुंबिक तणावापर्यंत… समाजाला मानसशास्त्रज्ञांची गरज का वाढत आहे? शाळेपासून कारागृहापर्यंत, कार्यालयापासून कुटुंबापर्यंत मानसिक आरोग्याची काळजी ही काळाची गरज
लेख : महाराष्ट्र निरोप्या आजचे युग हे वेगवान प्रगतीचे, स्पर्धेचे आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. माणसाच्या जीवनात सुखसोयी वाढल्या, दळणवळणाची साधने विकसित झाली आणि संधींची दारे खुली झाली; मात्र या प्रगतीसोबत मानसिक तणाव, एकटेपणा, असुरक्षितता, कौटुंबिक कलह आणि भावनिक असंतुलन यांसारख्या समस्याही गंभीरपणे समोर येत आहेत. वाढती गुन्हेगारी, आत्महत्यांच्या घटना, घटस्फोटांचे प्रश्न, मुलांमधील आक्रमकता, तरुणांमधील…
