मुकुंद चिलवंत यांनी स्वीकारला अहिल्यानगर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार
अहिल्यानगर, दि. २३-राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुकुंद चिलवंत यांना माहिती व जनसंपर्क विभागातील विविध स्तरांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. मंत्रालय, मुंबई येथील वृत्तचित्र…
