जम्मू-काश्मीर हादरलं : किश्तवाड़मध्ये ढगफुटी, १० ठार – बचाव कार्याला वेग, हवामान विभागाचा इशारा
जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड़ जिल्ह्यातील परेड-चाशोटी परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मोठी आपत्ती ओढावली आहे. आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढगफुटीनंतर अचानक आलेल्या पुरामुळे लंगर शेड (सामुदायिक स्वयंपाकघर) वाहून गेलं. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी घटनास्थळाचा आढावा घेत बचाव पथकांना तातडीने रवाना केलं…
