पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर दणदणीत प्रहार; जयकुमार गोरे यांचा इशारा – युद्ध झाल्यास पाकिस्तान नकाशावरून नामशेष होईल.
बातमी : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या कृत्यावर संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत असून, पाकिस्तानवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भाषेत निशाणा साधला आहे. “जर युद्ध झाले, तर त्याचे परिणाम…
